नमस्कार, सदर लेखांमध्ये आपण सिबिल स्कोर मोफत कसा चेक करायचा (Check CIBIL Score Free) आणि सिबिल स्कोर कसा वाढवायचा याबाबतची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
Check cibil score free: आपल्याला जेव्हा कोणत्याही कारणास्तव बँक किंवा वित्तीय संस्था त्याचबरोबर नॉन बँकिंग वित्तीय संस्थेकडून कर्ज घ्यायचे असते तेव्हा सदर संस्थांकडून सर्वप्रथम सिबिल स्कोर किंवा क्रेडिट स्कोर पाहिला जात असतो. जर तुमचा सिबिल स्कोर चांगला असेल तर तुम्हाला कर्ज हे बँका किंवा वित्तीय संस्था त्याचबरोबर नॉन बँकिंग वित्तीय संस्थांकडून मिळत असते. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही कर्ज प्रक्रिया सुरू करण्या अगोदर तुम्हाला जर तुमचा सिबिल स्कोर आधीच माहित असला तर तुम्हाला खात्री होते की ही कर्ज आपल्याला मिळेल की नाही.
सदर लेखांमध्ये आपण सिबिल स्कोर मोफत कसा चेक करायचा (Check CIBIL Score Free) हे तर पाहणारच आहोत त्याचबरोबर सिबिल स्कोर कसा वाढवायचा हेही पाहणे महत्त्वाचे आहे कारण, तुम्ही जेव्हा कोणत्याही वित्तीय संस्थेमध्ये कर्जासाठी अर्ज करत असता त्यावेळी ती वित्तीय संस्था तुमचा सिबिल स्कोर पाहत असते, जर तुमचा सिबिल स्कोर कमी असेल तर तुम्हाला कर्ज मिळू शकत नाही. म्हणूनच सिबिल स्कोर वाढवणे हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून असल्यामुळे त्यासाठी तुम्ही काय केले पाहिजे हेही आपण पाहूया.
CIBIL Score विषयी थोडक्यात…
सिबिल स्कोर ला क्रेडिट स्कोर म्हणून देखील ओळखले जाते. आर्थिक व्यवहार करणाऱ्या सर्वांचा सिबिल स्कोर हा Trans Union CIBIL Limited कंपनीद्वारे तयार केला जातो. सिबिल स्कोर किंवा क्रेडिट स्कोर हा संबंधित कर्जदार कर्जाची परतफेड करेल की नाही त्याचे परिमाण दर्शवत असतो.
आर्थिक व्यवहारांमध्ये सिबिल स्कोर हा एक मध्यस्ताची भूमिका पार पाडत असतो असे म्हटले तर वावगे ठरू नये, कारण बँका व वित्तीय संस्था त्याचबरोबर नॉन बँकिंग वित्तीय संस्था या कर्ज देताना सर्वप्रथम सिबिल स्कोर पाहत असतात. म्हणूनच सिबिल स्कोर हा कर्ज घेणाऱ्या व परतफेड करणाऱ्या व्यक्तीची गुंतवणूक दर्शवणारा आलेख म्हणून ओळखला जातो. सिबिल स्कोर हा 300 ते 900 च्या दरम्यान मोजला जातो. 750 व त्यापेक्षा अधिक सिबिल स्कोर कर्ज घेण्यासाठी चांगला मानला जातो.
CIBIL Score चे वर्गीकरण
- 300-579 – खराब
- 580-699 – स्कोअर सुधारत आहे.
- 670-739 – चांगला
- 740-799 – खूप चांगला
- 800-900 – उत्कृष्ट
वरील प्रमाणे सिबिल स्कोर चे वर्गीकरण केले जाते. त्या आधारे बँका, वित्तीय संस्था किंवा नॉन बँकिंग वित्तीय संस्था तुमच्याशी आर्थिक व्यवहार करायचा की नाही हे ठरवतात.
CIBIL Score कसा वाढवायचा?(How to increase CIBIL score)
बँका, वित्तीय संस्था आणि नॉन बँकिंग वित्तीय संस्थांकडून तुम्हाला कर्ज घेण्यासाठी तुमचा सिबिल स्कोर चांगला असणे आवश्यक आहे. जर काही कारणास्तव तुमचा सिबिल स्कोर कमी किंवा खराब असेल तर खालील माहितीच्या आधारे तुम्ही तुमचा सिबिल स्कोर वाढवू शकता.
- क्रेडिट कार्डचा मर्यादित वापर: क्रेडिट लिमिटच्या 30% पेक्षा जास्त क्रेडिट कार्डचा वापर करणे टाळा. जर क्रेडिट लिमिटच्या 50% पेक्षा जास्त क्रेडिट कार्डचा वापर केला तर तुमच्या सिबिल स्कोर वर याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
- क्रेडिट कार्डचे पेमेंट वेळेवर करा: क्रेडिट कार्डचे पेमेंट वेळेवर करणे हे तुमच्या क्रेडिट इतिहासातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. जर क्रेडिट कार्डची बिल वेळेवर भरले नाही तर त्याचा परिणाम सिबिल वर होऊन तुमचा सिबिल स्कोर कमी होऊ शकतो.
- गरजेपेक्षा जास्त क्रेडिट कार्ड घेणे टाळा: तुम्हाला जेवढ्या क्रेडिट कार्डची गरज आहे तेवढेच क्रेडिट कार्ड घ्या अनावश्यक क्रेडिट कार्ड घेणे टाळा. जास्त क्रेडिट कार्ड तुमचे क्रेडिट लिमिट आणि वापराच्या प्रमाणावर नकारात्मक परिणाम करू शकतात.
- क्रेडिट अहवालाचा मागोवा वेळोवेळी घ्या: तुमच्या क्रेडिट अहवालात कोणतीही त्रुटी किंवा चुकीची माहिती आढळून आली असती त्वरित दुरुस्त करून घ्या. चुकीची माहिती किंवा त्रुटी तुमच्या क्रेडिट स्कोर वर नकारात्मक परिणाम करू शकते.
- शून्य क्रेडिट्स टाळा: जर तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डचे बिल पूर्ण भरले असेल आणि तुमच्याकडे कोणतेही कर्ज नसेल तरीही काही क्रेडिट लाईन असणे गरजेचे आहे. शून्य क्रेडिट तुमच्या सिबिल स्कोरवर नकारात्मक परिणाम करू शकतात.
वरील सर्व बाबींचे काटेकोरपणे पालन केले तर तुमचा सिबिल स्कोर वाढू शकतो. सिबिल स्कोर सुधारण्यासाठी वेळ सामान्यतः एक चांगला सिबिल स्कोर मिळवण्यासाठी तुम्हाला 2 ते 3 वर्ष लागू शकतात.सिबिल स्कोर वाढल्यामुळे तुम्हाला आर्थिक व्यवहार करताना कोणतेही अडचण येणार नाही.
सिबिल स्कोर मोफत कसा चेक करायचा?(Check CIBIL Score Free)
सिबिल स्कोर तुम्ही वर्षातून एकदा मोफत चेक करू शकता. तो कसा चेक करायचा याबाबतची संपूर्ण माहिती आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत:
- सर्वप्रथम सिबिल स्कोर मोफत चेक करण्यासाठी सिबिल च्या वेबसाईटवर जावे लागेल.👇🏼👇🏼👇🏼 https://www.cibil.com/
- वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला Get Your CIBIL Score या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर तुम्हाला नवीन पेजवर एक फॉर्म तुमच्यासमोर येईल त्यामध्ये तुमची संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरायची आहे.
- तुम्ही दिलेल्या माहितीच्या आधारावर तुमचे एक अकाउंट तयार केले जाईल. त्या अकाउंटचा लॉगिन आयडेंट पासवर्ड तुम्हाला मिळेल. अकाउंट ऍक्टिव्ह करण्यासाठी तुमच्या ईमेल वरती एक मेल पाठवला जाईल त्या ईमेल मध्ये दिलेल्या लिंक वरती क्लिक करून तुमचे अकाउंट तुम्हाला सत्यापित करावे लागेल.
- तुम्हाला मिळालेल्या लॉगिन आयडी आणि पासवर्ड चा वापर करून सिबिल वेबसाईट वरती लॉगिन करून घ्या.
- आता तुम्हाला सबस्क्रीप्शन ची माहिती देण्यात येईल. तुम्हाला वर्षातून एकापेक्षा जास्त वेळा तुमचा सिबिल रिपोर्ट मिळवायचा असेल तर ही सबस्क्रिप्शन तुम्हाला घ्यावे लागेल. परंतु जर तुम्ही फक्त वर्षातून एकदा तुमचा सिविल रिपोर्ट पाहणार असाल तर तुम्ही फ्री मध्ये पाहू शकता. त्यासाठी तुम्ही सबस्क्रीप्शनच्या गोष्टी टाळू शकता.
- आता तुम्हाला पॅन कार्ड नंबर सह तुमची अतिरिक्त माहिती भरावी लागेल.
- त्यानंतर तुम्हाला तुमचे लोन व क्रेडिट कार्ड संबंधित काही प्रश्न विचारले जातील ज्याच्या आधारावर तुमचा सिबिल अहवाल तयार करून सिबिल स्कोर ची पूर्तता केली जाईल त्यामुळे विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे द्या.
- आता तुम्हाला तुमचा क्रेडिट रिपोर्ट तयार झालेला दिसेल. येथे तुम्ही तुमचा सिरीज खूप पाहू शकता त्याचबरोबर तुमचा क्रेडिट रिपोर्ट अहवाल पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करून घेऊ शकता.
अशा पद्धतीने तुम्ही तुमचा सिबिल स्कोर मोफत पणे मोबाईल वरून सुद्धा चेक करू शकता. (Check CIBIL Score Free)
सदर लेखांमध्ये आपण मोफत सिबिल स्कोर कसा चेक करायचा? (Check CIBIL Score Free) त्याचबरोबर सिबिल स्कोर कसा वाढवायचा? (How to increase CIBIL Score) याबद्दलची संपूर्ण माहिती दिली आहे. सदर माहितीच्या आधारावर तुम्ही मोफत सिबिल स्कोर चेक करू शकता त्याचबरोबर सिबिल स्कोर वरील मुद्द्यांच्या आधारावर कसा वाढवता येतो हेही पाहू शकता. धन्यवाद!