Lakhpati Didi scheme:’लखपती दीदी’ योजना काय आहे? महिलांना मिळणार पाच लाख रुपयापर्यंत मदत, जाणून घ्या…

महिलांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून महिलांसाठी अनेक योजना सुरू करण्यात येतात. आणि त्याचबरोबर आता महिलांसाठी केंद्र सरकारकडून एक नव्याने योजना सुरू करण्यात आलेली आहे तर केंद्र सरकारने आता महिलांसाठी लखपती निधी ही नवीन योजना सुरू केलेली आहे. पाच लाख रुपये पर्यंतचे बिनव्याजी कर्ज आहे ते कर्ज दिले जाणार आहे आणि त्याचबरोबर यामध्ये महिलांना सक्षम करण्यासाठी त्यांना विविध प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. तर नेमकी ही योजना काय आहे?या योजनेचा उद्देश काय? त्याचे फायदे काय? कशी आहे अर्ज प्रक्रिया जाणून घेऊया.

योजनेचा उद्देश काय? |Purpose

केंद्र सरकारने आतापर्यंत अनेक योजना आणल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून महिला सशक्तिकरणावर सरकारचा विशेष भर आहे. महिलांचे आर्थिक,सामाजिक प्रगती व्हावी यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सरकारकडून लखपती दीदी ही योजना राबवली जात आहे. गेल्या वर्षी केंद्र सरकारने ही योजना चालू केलेली आहे. उद्योग क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवा हा उद्देश समोर ठेवून ही योजना चालू करण्यात आली.

या योजनेची सुरुवात कधी झाली?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2023 रोजी स्वतंत्र दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून भाषण देताना  ‘लखपती दीदी’ योजनेची घोषणा केली. या योजनेनुसार महिला स्वयंरोजगार साठी आर्थिक मदत म्हणून बिनव्याजी 1 ते 5 लाख रुपयाचे कर्ज मिळेल. आर्थिक दृष्टिकोनातून सृजन असलेली महिला स्वतःच्या लाभ उभे करण्यासाठी आणि स्वावलंबी होण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे.

हे वाचा-  गुगल पे वरून तत्काळ मिळवा 1 लाख रुपये पर्सनल लोन.. | Google pay 1,00,000 Personal Loan

काय आहे पात्रता? | Eligibility

पात्रतेचे सामान्य निकष खालील प्रमाणे

  • योजनेसाठी फक्त महिलाच अर्ज करू शकतात.
  • महिलेचे वय 18 ते 50 दरम्यान असावे.
  • लाभार्थी महिला संबंधित राज्याची रहिवासी असावी.
  • वार्षिक उत्पन्न तीन लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
  • या योजनेसाठी सर्व अर्ज करणारी महिला बचत गटाशी संबंधित असणे आवश्यक आहे.

कागदपत्रे काय लागणार? | Documents

या योजनेसाठी अर्ज करताना आपल्याकडे कोण कोणती कागदपत्रे हवी, ती खालील प्रमाणे दिली आहेत.

  • आधार कार्ड (मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे)
  • पॅन कार्ड (Pan card)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (Income certificate)
  • पत्त्याचा पुरावा
  • पासबुक (Passbook)
  • रहिवासी दाखला
  • आय प्रमाणपत्र
  • ई-मेल आयडी (E-mail id)
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट फोटो (passport photo)

लखपती दीदी योजनेचे फायदे काय आहेत?  |Benifits

  • Lakhpati Didi Yojana Maharashtra ही योजना लहान कर्ज सुद्धा मिळवून देते, त्यामुळे महिलांना व्यवसाय, शिक्षण आणि इतर वेगवेगळ्या गरजांसाठी लहान कर्ज सहजपणे मिळून जाते.
  • व्यवसाय सुरू करण्यासाठी इच्छुक असलेल्या महिलांना व्यवसाय कसा चालू करायचा आणि कसा वाढवायचा याबाबतचे योग्य ते मार्गदर्शन या योजनेतर्फे केले जाते.
  • त्याचप्रमाणे महिलांच्या आर्थिक ज्ञान वाढवण्यासाठी आर्थिक  साक्षरता कार्यशाळांचे आयोजन केले जाते. त्यामध्ये त्यांना बजेट व गुंतवणूक व बचत यांसारख्या गोष्टींची माहिती देण्यात येते.
  • या योजनेतर्फे महिलांना महिलांना अशा किमतीत विमा संरक्षण सुद्धा दिले जाते.
हे वाचा-  मोबाईल वरून Shriram One App मधून कमी सिबिल वर मिळवा 50,000रु तुमच्या बँक खात्यावर |Shriram One App Personal Loan

महिला कशा होणार लखपती?

लखपती दीदीच्या योजनेनुसार महिलांना वेगवेगळ्या प्रकारचे कौशल्य शिकवले जाणार आहे. या प्रशिक्षणाच्या दरम्यान महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी यांना काही टिप्स दिल्या जातील. त्याचबरोबर इकॉनोमिक विषयांची माहिती देण्यासाठी वर्कशॉप (workshop), बिझनेस प्लॅन(business plan), मार्केटिंग(marketing), सेविंग आणि गुंतवणुकीची माहिती दिली जाते. याचबरोबर व्यवसायासोबत तंत्रज्ञानाचा उपयोग करून डिजिटल बँकिंग सेवा, मोबाईल मॉडेल आणि फोन बँकिंग यांचे प्रशिक्षण दिले जाते.

योजनेच्या लाभासाठी अर्ज कसा करायचा?

लखपती दीदी योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर महिलांना बचत गटाच्या माध्यमातून एका कोणत्यातरी उद्योगाचे नियोजन करावे लागेल. या उद्योगाचा आराखडा सरकारला प्रथम पाठवला जाईल. त्यानंतर आराखडा तसेच लखपती दीदी योजनेसाठी पात्र आहेत का? याची सरकार पडताळणी करेल. त्यानंतर सर्व अटींची पूर्तता होत असेल तर महिलांना पाच लाख रुपये पर्यंत कर्ज दिले जाईल.

हे पण वाचा 👇

Leave a Comment