महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी rojgar.mahaswayam.in ही अधिकृत वेबसाईट सुरू करण्यात आली आहे. अर्जदारांनी खालीलप्रमाणे ऑनलाईन अर्ज भरावा:
- अधिकृत वेबसाईटला भेट द्या – rojgar.mahaswayam.in वर जा.
- होमपेजवर “Jobseeker” पर्याय निवडा – हा पर्याय सिलेक्ट केल्यावर नवीन पेज उघडेल.
- नोंदणी फॉर्म भरा – तुमचे नाव, मोबाइल नंबर, आधार क्रमांक व ईमेल भरावा.
- OTP पडताळणी करा – दिलेल्या नंबरवर आलेला OTP टाकून पुढील स्टेपसाठी वाढा.
- शैक्षणिक आणि रोजगार माहिती भरा – तुमचे शिक्षण व सध्या असलेली बेरोजगारी यासंबंधी माहिती द्या.
- कागदपत्रे अपलोड करा – आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
- फॉर्म सबमिट करा – सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट करा आणि अर्जाची प्रिंटआउट घ्या.
