संजय गांधी निराधार योजनेतून 1500 रुपये लाभ घेण्यासाठी अर्जप्रकीया

ऑफलाईन अर्ज

संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने संबंधित तहसील कार्यालयात किंवा जिल्हा सामाजिक कल्याण कार्यालयात अर्ज सादर करावा. तसेच, राज्य सरकारच्या अधिकृत वेबसाइटवरूनही ऑनलाईन अर्ज करता येतो. अर्ज करताना अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे सादर करणे गरजेचे आहे.

ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया

1. अधिकृत वेबसाईटला भेट द्या

संजय गांधी निराधार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी Aaple Sarkar या अधिकृत पोर्टलवर जा.

2. नवीन युजर नोंदणी करा

  • जर तुम्ही पहिल्यांदाच अर्ज करत असाल, तर “New User Registration” (नवीन युजर नोंदणी) वर क्लिक करा.
  • तुमचे नाव, वडिलांचे नाव, जन्मतारीख, लिंग, व्यवसाय, मोबाईल नंबर, आणि पत्ता भरा.
  • ओळखीचा पुरावा (आधार कार्ड, पॅन कार्ड इत्यादी) आणि पासपोर्ट साइज फोटो अपलोड करा.
  • सर्व माहिती भरल्यानंतर “Register” (नोंदणी करा) बटणावर क्लिक करा.

3. लॉगिन करा

  • युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.
  • डॅशबोर्डवर जाऊन “Sanajay Gandhi Niradhar Yojana” (संजय गांधी निराधार योजना) हा पर्याय निवडा.

4. अर्ज भरणे

  • योजनेच्या फॉर्ममध्ये तुमची संपूर्ण माहिती भरावी.
  • आवश्यक कागदपत्रे (आधार कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, बँक पासबुक, रहिवासी प्रमाणपत्र इत्यादी) अपलोड करा.
  • माहिती योग्य आहे का, याची खात्री करून फॉर्म सबमिट करा.

5. अर्जाची स्थिती तपासा

  • अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्ही Aaple Sarkar पोर्टल वर लॉगिन करून अर्जाचा स्टेटस पाहू शकता.
  • अधिक माहितीसाठी संबंधित तहसील कार्यालयात संपर्क साधा.
हे वाचा-  पीएम किसान 2000 रुपये योजनेची गावानुसार शेतकरी यादी कशी पहावी

6. अर्ज मंजूर झाल्यानंतर

  • अर्ज मंजूर झाल्यास तुमच्या बँक खात्यात दरमहा ठरलेली मदत जमा केली जाईल.

7. मदतीसाठी हेल्पलाइन

  • कोणतीही अडचण आल्यास टोल-फ्री हेल्पलाइन नंबर 1800-120-8040 वर संपर्क साधा.

Leave a Comment