नमस्कार, सदर लेखांमध्ये आपण Google pay 1 lakh personal loan कसे मिळवायचे याबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या योजना पूर्ण करण्यासाठी वैयक्तिक कर्जाची आवश्यकता असेल तर, आता तुम्हाला वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी बँक किंवा इतर वित्तीय संस्थेमध्ये हेलपाटे मारण्याची गरज असणार नाही, कारण आता तुम्ही ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या सहजपणे Google pay 1 lakh personal loan मिळवू शकता.
आजकाल डिजिटल पेमेंटची सुविधा मोबाईल मधील विविध एप्लीकेशनच्या माध्यमातून देण्यात येत आहे. त्यापैकी गुगल पे हे एक ऑनलाईन बँकिंग सेवा प्रदान करणारे एक महत्त्वाचे ॲप्लिकेशन आहे. गुगल पे च्या माध्यमातून तुम्ही विविध प्रकारचे आर्थिक व्यवहार सहजरीत्या करू शकता. गुगल पे च्या माध्यमातून आता वैयक्तिक कर्जही दिले जात आहे. Google pay personal loan चे मुख्य उद्दिष्ट म्हणजे, बँकेद्वारे राबविण्यात येणाऱ्या वेळ खाऊ प्रक्रिया टाळून गरजूंना वैयक्तिक कर्ज अगदी सहज आणि सुलभ आणि उपलब्ध करून देणे.
Google pay 1,00,000 Personal Loan मिळवण्यासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीला कोणती पात्रता पूर्ण करावी लागते? त्याचबरोबर गुगल पे पर्सनल लोन साठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? गुगल पे वरून घेण्यात येणाऱ्या वैयक्तिक कर्जाचा व्याजदर व परतफेडीचा कालावधी किती आहे? त्याचबरोबर गुगल पे वरून वैयक्तिक कर्ज मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा? याबाबतची संपूर्ण माहिती सदर लेखांमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा जेणेकरून तुम्ही गुगल पे वरून वैयक्तिक कर्ज कसे मिळवायचे? याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकाल.
Google pay 1,00,000 Personal Loan व्याजदर व परतफेडीचा कालावधी
Google pay personal loan व्याजदर 14% ते 36% वार्षिक असू शकतो. ही व्याजदर ग्राहकाच्या नोकरी प्रोफाइल, उत्पन्न त्याचबरोबर क्रेडिट इतिहासावर अवलंबून असतो.
Google pay personal loan परतफेडीचा कालावधी हा तुमच्या पात्रतेनुसार त्याचबरोबर कर्जाच्या रक्कमेवरून ठरवला जातो. सर्वसाधारणपणे Google pay Personal Loan परतफेडीचा कालावधी हा 3 ते 5 वर्ष असू शकतो.
Google pay 1,00,000 Personal Loan पात्रता
Google pay personal loan साठी अर्ज करण्यापूर्वी अर्जदाराला काही अटी व शर्ती जाणून घेणे आवश्यक असते. या अटी व शर्ती मध्ये अर्जदार पात्र होत असेल तरच त्याला गुगल प्ले द्वारे वैयक्तिक कर्ज मिळू शकते. सदरच्या अटी व शर्ती कोणत्या आहेत ते खालीलप्रमाणे:
- Google pay personal loan साठी अर्ज करणारा अर्जदार हा भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचे वय 21 ते 60 वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
- Google pay personal loan साठी अर्ज करणारे अर्जदाराचा सिबिल स्कोर चांगला असणे गरजेचे आहे.
- सदर कर्जासाठी नोकरदार किंवा स्वयंरोजगार व्यक्ती अर्ज करू शकतात कारण त्यांच्याकडे एक शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत आहे. त्यामुळे अशा व्यक्ती सदर कर्जासाठी सहज पात्र होतात.
- Google pay personal loan साठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराकडे स्वतःचे बँक खाते त्याच्या आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे.
- सदर कर्जासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे मासिक उत्पन्न किमान 25,000 रुपये असणे गरजेचे आहे.
Google pay 1,00,000 Personal Loan आवश्यक कागदपत्रे
ज्या व्यक्तींना Google pay personal loan साठी अर्ज करायचा आहे त्यांना सदर कर्जासाठी काही कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असते. सदरची कागदपत्रे ही अर्जदाराने ऑनलाईन अर्ज करताना स्कॅन करून अपलोड करायची असतात. गुगल पे वैयक्तिक कर्जासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ते खालीलप्रमाणे:
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- पासपोर्ट साईज फोटो
- अर्जदाराचे मागील 6 महिन्याचे बँक स्टेटमेंट
- अर्जदाराच्या मागील 3 महिन्याच्या पगाराच्या स्लिप्स
Google pay 1,00,000 Personal Loan ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
Google pay personal loan घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीला अर्ज हा ऑनलाईन करावा लागतो. सदर कर्जासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा याबाबतची स्टेप बाय स्टेप माहिती आपण खाली सोप्या पद्धतीने पाहणार आहोत:
- सर्वप्रथम Google pay personal loan साठी अर्ज करणारे अर्जदाराला त्याच्या मोबाईल मध्ये Google Play Store वरून Google Pay app डाउनलोड करावे लागेल.👇🏼👇🏼👇🏼 https://play.google.com/store/apps/details?id=com.google.android.apps.nbu.paisa.user
- Google Pay App डाऊनलोड केल्यानंतर ते ओपन करून ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर वापरून साइन इन करा.
- साइन इन केल्यानंतर तुमचे बँक खाते Google pay सोबत लिंक करा.
- त्यानंतर Google Pay App चा डॅशबोर्ड उघडेल येथे खाली दिलेल्या ‘व्यवसाय आणि बिल’ पर्यायावर क्लिक करा.
- क्लिक केल्यानंतर Google pay loan पर्याय निवडा.
- त्यानंतर ‘Start Your Loan Application’ या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर तुमच्यासमोर Google pay loan अर्ज ओपन होईल. हा अर्ज व्यवस्थित व काळजीपूर्वक भरा.
- अर्जामध्ये सर्व माहिती भरल्यानंतर आधार कार्डशी लिंक केलेल्या मोबाईल नंबर वर पाठवलेला OTP प्रविष्ट करा.
- OTP पडताळणीनंतर Submit बटनावर क्लिक करा.
- त्यानंतर Google pay तुमची पात्रता तपशील आणि तुम्ही सदर कर्जासाठी पात्र आहात हे दाखवेल. त्यानंतर तुम्हाला Google play कडून एक लाख रुपये पर्यंतचे कर्ज मिळू शकते.
- त्यानंतर तुम्ही तुम्हाला घ्यायचे असलेले कर्ज निवडा व त्यानंतर EMI निवडून अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.
अशा सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी कागदपत्रांमध्ये तुम्ही Google pay ₹1 lakh personal loan मिळवू शकता.
सदर लेखामध्ये आपण Google pay ₹1,00,000 personal loan कसे मिळवायचे याबद्दलची संपूर्ण माहिती पाहिली आहे. सदर माहितीच्या आधारे तुम्ही गुगल पे वरून वैयक्तिक कर्ज मिळवून तुम्ही तुमच्या योजना पूर्ण करू शकता. धन्यवाद!